Second-generation temple builders · 25+ years · 450+ temples · For trusts, housing societies and builders मंदिर उभारणीची दुसरी पिढी · २५ वर्षांचा अनुभव · ४५०+ मंदिरे · देवस्थान ट्रस्ट, सोसायट्या आणि बिल्डरांसाठी

We build more than temples. We build legacies. आम्ही मंदिरे उभारतो, आणि पिढ्यांचा वारसा घडवतो.

Crafting sacred spaces with faith, tradition and excellence. श्रद्धा, परंपरा आणि उत्कृष्टतेने घडवलेल्या पवित्र वास्तू.

Stone, RCC and marble temples for trusts, housing societies and builders in Pune, Mumbai and across India. Every temple is planned on the sacred Vastu Purusha Mandala, seen first in a precise 3D model, and raised to Shilpa Shastra, with one itemised quotation, construction-linked payments and every rupee accounted for. पुणे, मुंबई आणि देशभरातील देवस्थान ट्रस्ट, सोसायट्या आणि बिल्डरांसाठी दगडी, RCC आणि संगमरवरी मंदिरे. प्रत्येक मंदिराचा आराखडा वास्तुपुरुष मंडलावर रचला जातो, पहिली कुदळ मारण्याआधीच ते 3D मध्ये डोळ्यांसमोर उभे राहते, आणि मग शिल्पशास्त्राप्रमाणे कळसापर्यंत चढते. सोबत एकच स्पष्ट कोटेशन, टप्प्याटप्प्याने पेमेंट आणि पै न् पैचा हिशोब.

Enquire now चौकशी करा

Send us photos of your site. We reply the same day. जागेचे दोन-चार फोटो पाठवा, उत्तर त्याच दिवशी मिळेल.

25+years of temple workवर्षांचा अनुभव
450+temples completedमंदिरे पूर्ण
27+under constructionमंदिरांचे काम सुरू
2ndदुसरीgeneration of temple buildersपिढी मंदिरकामात
Carved stone shikhara of a Nagara-style temple
Diagram: the temple as the human body, from entrance (feet) to kalasha (crown) Kalashathe crown (Sahasrara) Amalakasun · lotus · gateway Shikharathe head · Meru · the spine Garbhagrihathe heart · womb chamber Mandapathe body Entrancethe feet कळसमस्तक (सहस्रार) आमलकसूर्य · कमळ · उच्च लोकांचे द्वार शिखरशिर · मेरू · पाठीचा कणा गर्भगृहहृदय · गर्भस्थान मंडपधड प्रवेशद्वारपाय
The temple read as a body, from the feet at the entrance to the kalasha at the crown.प्रवेशद्वारातील पायांपासून माथ्यावरील कळसापर्यंत: देहरूपी मंदिर.

Where devotion meets architecture, divinity takes shapeदेवालयाची निर्मिती म्हणजे भक्तीला दिलेले सुंदर रूप

In the Shilpa tradition, a temple is a mandala in stone. It holds the universe (Brahmanda), the cosmic mountain Meru and the human body in a single form, so a devotee walking from the gate to the sanctum is also walking inward, towards the self.शिल्पपरंपरेत मंदिर म्हणजे दगडात कोरलेले मंडल. ब्रह्मांड, विश्वाचा अक्ष असलेला मेरू पर्वत आणि मानवी देह, हे तिन्ही एकाच रूपात सामावलेले. म्हणून प्रवेशद्वारापासून गाभाऱ्याकडे जाणारा भक्त खरे तर स्वतःच्या अंतरंगाकडे प्रवास करत असतो.

  • Garbhagrihaगर्भगृह the sanctum, or womb chamberगाभारा

    The dark, quiet heart of the temple, where the formless takes form and a single lamp stands for pure consciousness.मंदिराचे शांत, अंधारे हृदय. इथे निराकार साकार होतो, आणि एकच ज्योत शुद्ध चैतन्याची साक्ष देते.

  • Shikharaशिखर the towerमंदिराचा माथा

    Rising like Mount Meru, and like the spine, it carries the eye and the mind upward, towards liberation (moksha).मेरू पर्वतासारखे, पाठीच्या कण्यासारखे वर झेपावणारे; नजर आणि मन दोन्ही मोक्षाच्या दिशेने वर नेणारे.

  • Amalakaआमलक the ribbed crowning stoneशिखरावरील रेषांकित चक्र

    Read as the sun or a lotus: the threshold between the temple and the higher realms.सूर्याचे वा कमळाचे प्रतीक; मंदिर आणि उच्च लोक यांच्यामधील उंबरठा.

  • Kalashaकळस the crowning potमंदिराचा मुकुट

    The vessel of fullness (Purna-Kalasha) and immortal nectar, the temple's crown, its Sahasrara.पूर्णकलश, अमृताचा घट; मंदिराच्या मस्तकावरील सहस्रार.

Explore the meaning of every part →मंदिराच्या प्रत्येक अंगाचा अर्थ जाणून घ्या →

Precise 3D design. Traditional craftsmanship.अचूक 3D आराखडा. अस्सल पारंपरिक कारागिरी.

Every temple we build starts as a detailed 3D model and is finished by craftsmen from a 25-year family tradition.प्रत्येक मंदिर आधी अचूक 3D आराखड्यात साकारते, आणि मग २५ वर्षांची घरंदाज परंपरा असलेल्या कारागिरांच्या हातून पूर्णत्वास जाते.

3D structural modelling3D आराखडा आणि स्ट्रक्चरल डिझाइन

See your temple from every angle before work begins: the shikhar, the mandapa, every pillar and the exact proportions. Your committee approves a design it can see, and our structural engineer checks every load before construction starts.शिखर, मंडप, प्रत्येक खांब आणि त्यांचे नेमके प्रमाण: काम सुरू होण्याआधीच सर्व बाजूंनी पाहा. समिती जे डोळ्यांनी पाहते, तेच मंजूर करते. पाया घालण्याआधी आमचे स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रत्येक भाराचा हिशोब पक्का करतात.

Traditional craftsmanshipछिन्नी-हातोड्याची परंपरा

Carving, stone setting and finishing by second-generation temple builders, following Shilpa Shastra and Vastu, in stone, RCC or marble.कोरीव काम, दगडांची जुळणी आणि शेवटचा हात, सारे शिल्पशास्त्र व वास्तुशास्त्राच्या चौकटीत. मंदिरकामातील दुसऱ्या पिढीचे हात, मग ते दगड असो, RCC असो वा संगमरवर.

Who we build forज्यांच्या खांद्यावर मंदिराची जबाबदारी, त्यांच्यासाठी

Standalone temples for the people responsible for them.गावाचे, सोसायटीचे, समाजाचे स्वतःचे स्वतंत्र मंदिर.

Housing societiesहाउसिंग सोसायटी

A temple in your society's amenity space, finished in 3–4 months with minimal disruption to residents.सोसायटीच्या मोकळ्या जागेत देखणे मंदिर, अवघ्या ३–४ महिन्यांत आणि रहिवाशांना फारसा त्रास न देता.

Temple trusts & villagesदेवस्थान ट्रस्ट आणि गावे

New temples and jirnoddhar for trusts and village committees, with accounts your devotees can trust.नवे मंदिर असो वा जीर्णोद्धार, भक्तांच्या प्रत्येक देणगीचा चोख हिशोब.

Builders & townshipsबिल्डर आणि टाउनशिप

The temple amenity in your project, delivered on your handover schedule.तुमच्या प्रकल्पातील मंदिर, तुमच्या हँडओव्हरच्या तारखेला तयार.

Families & private trustsकुटुंबे आणि खाजगी ट्रस्ट

Kuldaivat and private temples, built in stone to last for generations.कुलदैवताचे मंदिर, पुढच्या पिढ्यांसाठी दगडात कोरलेले.

Stone, RCC or marble, matched to your land and your budgetदगड, RCC की संगमरवर? जागा आणि बजेट पाहून योग्य निवड

Black stone temple with carved pillars and an Om Namah Shivaya frieze

Black stone / Hemadpantiकाळा पाषाण / हेमाडपंती

Carved basalt in the Maharashtrian tradition. The most durable choice, for trusts and village temples.महाराष्ट्राच्या मातीतील कोरीव काळा पाषाण. शतकानुशतके टिकणारा, देवस्थानांचा आणि गावमंदिरांचा पहिला मान.

Temple with a designed shikhar and carved plaster finish, lit at dusk

RCC with carved plasterRCC आणि नक्षीदार प्लास्टर

An engineered RCC frame with a designed shikhar and plaster carving. Fast and cost-effective, ideal for societies.मजबूत RCC सांगाडा, देखणे शिखर आणि प्लास्टरमधील नक्षी. कमी वेळ, आटोपशीर खर्च; सोसायटीसाठी अगदी योग्य.

White marble temple in a landscaped campus

Marbleमार्बल

Marble cladding and flooring for a bright, serene finish, inside and out.आतून-बाहेरून संगमरवरी आवरण आणि फरशी; मंदिराला शुभ्र, प्रसन्न तेज.

॥ श्री ॥

A temple for every deity, built the way that deity is worshippedप्रत्येक दैवताचे मंदिर, त्याच्या उपासनेला साजेसे

Each deity has its own direction, its own festivals and its own way of being worshipped. We plan the sanctum, the mandap and the space around them for exactly that.प्रत्येक दैवताची दिशा वेगळी, उत्सव वेगळे, उपासनेची रीत वेगळी. गाभारा, मंडप आणि भोवतालची जागा आम्ही त्याच रीतीला धरून आखतो.

ॐ गं गणपतये नमः

Ganapatiगणपती

Often the first temple of a society or village, sized for the daily aarti and the Ganeshotsav crowd.सोसायटी असो वा गाव, पहिले मंदिर बहुधा बाप्पाचेच. रोजची आरती आणि गणेशोत्सवाची गर्दी डोळ्यांसमोर ठेवून आराखडा.

ॐ नमः शिवाय

Shivaशिव

East-facing garbhagriha, a Nandi mandapa in line with the linga, and a correct outlet for abhishek water (somasutra).पूर्वाभिमुख गाभारा, लिंगासमोर नंदी मंडप, आणि अभिषेकाच्या पाण्यासाठी शास्त्रशुद्ध सोमसूत्र.

येळकोट येळकोट जय मल्हार

Khandoba · Malhariखंडोबा · मल्हारी

Khandoba temples in the Jejuri spirit: a raised sanctum, a deepmal and an open court for bhandara and tali bharne.जेजुरीच्या थाटाचे खंडेरायाचे मंदिर: उंच गाभारा, दीपमाळ, आणि भंडारा उधळण्यासाठी व तळी भरण्यासाठी मोकळे प्रांगण.

ॐ हं हनुमते नमः

Hanuman · Marutiहनुमान · मारुती

A strong, compact shrine, often at the village entrance, with a sabhamandap for Saturday darshan and a tall deepmal.वेशीवरचा मारुतीराया: भक्कम, आटोपशीर गाभारा, शनिवारच्या दर्शनासाठी सभामंडप आणि उंच दीपमाळ.

ॐ दुं दुर्गायै नमः

Durga · Bhavani · Ambabaiदुर्गा · भवानी · अंबाबाई

Devi temples planned around Navratri: a wide mandap, a place for ghatasthapana and a pradakshina path for the palkhi.नवरात्राचा उत्सव डोळ्यांसमोर ठेवून: प्रशस्त मंडप, घटस्थापनेची जागा आणि पालखीसाठी प्रदक्षिणा मार्ग.

ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः

Mahalakshmiमहालक्ष्मी

Bright marble sanctums, in pure white or with gold detailing, for Lakshmi temples and Diwali puja.लक्ष्मीसाठी तेजस्वी संगमरवरी गाभारा, शुभ्र किंवा सोनेरी नक्षीसह; दिवाळीच्या पूजेसाठी साजेसा.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

Shri Dattaश्री दत्त

Datta mandirs with an audumbar tree in the courtyard, paduka darshan and space for Datta Jayanti.आवारात औदुंबराचे झाड, पादुका दर्शन आणि दत्तजयंतीच्या सोहळ्यासाठी जागा असलेले दत्त मंदिर.

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Samarthश्री स्वामी समर्थ

Swami Samarth maths and kendras, with a seva hall for daily naamjap, paduka darshan and the prakat din utsav.स्वामी समर्थ मठ आणि केंद्र: रोजच्या नामजपासाठी सेवा हॉल, पादुका दर्शन आणि प्रकटदिनाच्या उत्सवाचे नियोजन.

ॐ साई राम

Sai Babaसाईबाबा

Sai mandirs with a dhuni, a hall for the four daily aartis and a route for the Thursday palkhi.धुनी, दिवसातील चारही आरत्यांसाठी सभामंडप, आणि गुरुवारच्या पालखीसाठी मार्ग असलेले साई मंदिर.

श्री राम जय राम जय जय राम

Shri Ramश्रीराम

A sanctum wide enough for the full Ram Darbar, and a mandap for Ram Navami kirtan.राम-सीता-लक्ष्मण-हनुमान असा पूर्ण राम दरबार बसेल असा गाभारा, आणि रामनवमीच्या कीर्तनासाठी मंडप.

ॐ नमो भगवते वासुदेवाय

Shri Krishnaश्रीकृष्ण

Radha–Krishna temples with a wide mandap for bhajan and Janmashtami, and an open court for the dahi handi.राधा-कृष्ण मंदिर: भजनासाठी प्रशस्त मंडप, जन्माष्टमीचा सोहळा, आणि दहीहंडीसाठी मोकळे आवार.

ॐ नमो वेङ्कटेशाय

Balaji · Venkateshwaraबालाजी · व्यंकटेश

Balaji temples in the South Indian tradition, with a gopuram-style entrance, a dhwajastambha and room for the kalyanotsavam.दक्षिणेकडील परंपरेतील बालाजी मंदिर: गोपुरासारखे प्रवेशद्वार, ध्वजस्तंभ आणि कल्याणोत्सवासाठी प्रशस्त जागा.

जोतिबाच्या नावानं चांगभलं

Jyotibaजोतिबा

Jyotiba temples planned for gulal, the tall sasankathi poles and the Chaitra yatra crowds.गुलालाची उधळण, उंच सासनकाठ्या आणि चैत्र यात्रेची गर्दी लक्षात घेऊन आखलेले जोतिबाचे मंदिर.

ॐ ऐं सरस्वत्यै नमः

Saraswatiसरस्वती

Quiet, light-filled shrines for schools, colleges and campuses, where students begin each day.शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संकुलांसाठी शांत, प्रकाशाने उजळलेले मंदिर; जिथे विद्यार्थ्यांचा दिवस सुरू होतो.

श्री कुलदेवता प्रसन्न

Gram Daivat · Kuldaivatग्रामदैवत · कुलदैवत

Rebuilding the village or family deity, be it Bhairavnath, Jogeshwari, Mhasoba or Biroba, while keeping the old murti's place, direction and rituals.भैरवनाथ, जोगेश्वरी, म्हसोबा, बिरोबा: गावाच्या वा कुळाच्या दैवताचे नवे मंदिर, जुन्या मूर्तीचे स्थान, दिशा आणि परंपरा जपूनच.

Also Renuka, Saptashrungi, Gajanan Maharaj, Jain and community temples.रेणुका, सप्तशृंगी, गजानन महाराज, जैन मंदिरे आणि समाज मंदिरेही.

Temples we have built, and temples rising right nowउभी राहिलेली मंदिरे, आणि आज आकार घेत असलेली

Every photo below is our own work. Each one is labelled Completed, Under construction or 3D design, so you know exactly what you're looking at.इथला प्रत्येक फोटो आमच्याच कामाचा. प्रत्येकावर स्पष्ट खूण: पूर्ण, काम सुरू, की 3D आराखडा.

25+ years of temple work२५+ वर्षांचे मंदिरकाम 2nd-generation temple buildersमंदिर उभारणीची दुसरी पिढी 450+ temples completed४५०+ मंदिरे पूर्ण 27+ under construction२७+ मंदिरांचे काम सुरू Stone · RCC · Marbleदगड · RCC · संगमरवर
3D design3D आराखडा Shree Kalbhairavnath Temple, Bopgaon

Shree Kalbhairavnath Temple, Bopgaonश्री काळभैरवनाथ मंदिर, बोपगाव

Marble with gold detailing · shikhara with an arched sabhamandapसंगमरवर आणि सोनेरी नक्षी · कळसासोबत कमानींचा सभामंडप

3D design3D आराखडा Kalbhairavnath Temple, black stone option

Kalbhairavnath Temple, black stone optionकाळभैरवनाथ मंदिर, काळ्या पाषाणातील पर्याय

The same plan in black basalt, shown to the committee side by sideहाच आराखडा काळ्या पाषाणात; समितीसमोर दोन्ही पर्याय शेजारी-शेजारी

3D design3D आराखडा Shree Hanuman Mandir

Shree Hanuman Mandirश्री हनुमान मंदिर

Pink sandstone · carved pillars, elephant steps and a garden courtगुलाबी वालुकाश्म · नक्षीदार खांब, हत्तींच्या पायऱ्या, बागेतले आवार

3D design3D आराखडा Garden temple with a domed mandapa

Garden temple with a domed mandapaघुमटाकार मंडपाचे उद्यान मंदिर

Pink stone shikhara and dome · Om jaali, bells and lamp pillarsगुलाबी दगडातील कळस आणि घुमट · ॐ जाळी, घंटा, दीपस्तंभ

3D design3D आराखडा Shree Durgamata Mandir, housing society

Shree Durgamata Mandir, housing societyश्री दुर्गामाता मंदिर, गृहनिर्माण सोसायटी

Sandstone · carved railings and a raised plinth inside the societyवालुकाश्म · सोसायटीच्या आवारात नक्षीदार कठडे आणि उंच जोते

3D design3D आराखडा Society temple in pink sandstone

Society temple in pink sandstoneगुलाबी वालुकाश्मातील सोसायटी मंदिर

Compact plan for a society garden · carved arches on all sidesसोसायटीच्या बागेसाठी आटोपशीर आराखडा · चारही बाजूंनी कोरीव कमानी

3D design3D आराखडा White marble temple in a campus garden

White marble temple in a campus gardenउद्यानातील शुभ्र संगमरवरी मंदिर

Makrana-style white marble · shikhara, dome and balustraded courtशुभ्र संगमरवर · कळस, घुमट आणि कठड्यांचे प्रांगण

3D design3D आराखडा Twin-shikhara temple with a gateway arch

Twin-shikhara temple with a gateway archदोन कळसांचे, तोरण-कमानीचे मंदिर

Carved sandstone · elephant frieze and lit plinthकोरीव वालुकाश्म · हत्तींची पट्टी आणि प्रकाशित जोते

3D design3D आराखडा Hanuman garbhagriha in marble

Hanuman garbhagriha in marbleसंगमरवरी हनुमान गाभारा

Backlit carved arch · marble walls and inlaid floorप्रकाशित कोरीव कमान · संगमरवरी भिंती आणि नक्षीदार फरशी

See all our temples →आमची सर्व मंदिरे पाहा →

From concept to consecration, in six stepsसंकल्पनेपासून प्राणप्रतिष्ठेपर्यंत: सहा पावले

  1. Site surveyजागेची पाहणी

    We study your land, its direction and access, and listen to what your committee wants. Free site visit within 250 km of Pune.जागा, दिशा आणि रस्ता नीट पाहतो, समितीचे मनोगत ऐकतो. पुण्यापासून २५० किमीपर्यंत साईट व्हिजिट मोफत.

  2. 3D model & design approval3D आराखडा आणि मंजुरी

    A precise 3D model to Shilpa Shastra and Vastu. You review it, we refine it, and the design is final.शिल्पशास्त्र व वास्तुप्रमाणे अचूक 3D आराखडा. तुम्ही सुचवा, आम्ही बदल करू; मनासारखा झाला की आराखडा पक्का.

  3. Quotation & work orderकोटेशन आणि वर्क ऑर्डर

    An itemised quotation for the final design, with a construction-linked payment plan. Work starts when you sign.पक्क्या आराखड्याचे सविस्तर कोटेशन आणि टप्प्याटप्प्याचा पेमेंट प्लॅन. सही झाली की कामाला सुरुवात.

  4. Material selectionसाहित्याची निवड

    Stone, marble and finishes chosen with you, with brands and rates named in writing.दगड, संगमरवर आणि फिनिशिंग तुमच्यासोबत बसून निवडतो; ब्रँड आणि दर सगळे लेखी.

  5. Carvingकोरीव काम

    Shikhar, pillars and details carved by our craftsmen, matched to the approved 3D model.शिखर, खांब आणि नक्षी, मंजूर 3D आराखड्याबरहुकूम, आमच्या कारागिरांच्या छिन्नीतून.

  6. Erection & handoverउभारणी आणि हस्तांतरण

    Assembly on site, kalash and finishing, with photo updates to your committee, ready for pran pratishtha.जागेवर उभारणी, कळसारोहण आणि शेवटचा हात. समितीला वेळोवेळी फोटो, आणि मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज.

Your committee's money, handled the way you would handle it.समितीचा पैसा, तुमच्याइतक्याच काळजीने.

Know the full cost before the first brick is laid.पहिली वीट रचण्याआधीच पूर्ण खर्च हातात.

Our quotation spells out everything: the cement brand and grade, the marble rate per square foot, the door budget, the paint brand, and what is not included (such as the idol or kalash, if your donor provides them). Nothing gets added halfway through. There are no surprise bills at your next committee meeting.आमच्या कोटेशनमध्ये सारे काळ्यावर पांढरे: सिमेंटचा ब्रँड आणि ग्रेड, मार्बलचा प्रति स्क्वेअर फूट दर, दरवाजाचे बजेट, रंगाचा ब्रँड, आणि काय धरलेले नाही तेही. म्हणून काम अर्ध्यावर आल्यावर “वाढीव खर्च” हा शब्दच येत नाही.

Pay stage by stage, as you watch it rise.मंदिर उभे राहताना पाहा, आणि त्याप्रमाणे पैसे द्या.

Payments are linked to construction stages, so your money never runs far ahead of the work you can see. Every week, progress photos go straight to your committee's WhatsApp group, so every member sees the same progress you do. Pay in cash, by cheque or online, whichever suits your trust.पेमेंट कामाच्या टप्प्यांशी बांधलेले, त्यामुळे पैसा कधीच कामाच्या खूप पुढे धावत नाही. दर आठवड्याला कामाचे फोटो थेट समितीच्या WhatsApp ग्रुपवर. रोख, चेक की ऑनलाइन, जसे तुम्हाला सोयीचे.

Built to shastra. Engineered to last for generations.शास्त्राचा पाया, पिढ्यान्‌पिढ्यांची मजबुती.

Proportions follow Shilpa Shastra, and our own structural engineer designs every RCC frame. We are second-generation temple builders, with more than 25 years of experience and over 450 temples completed in stone, RCC and marble. A temple is built once, so we build it to stand for a hundred years.मंदिराचे प्रमाण शिल्पशास्त्राप्रमाणे, आणि RCC चे डिझाइन आमच्याच स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून. मंदिर उभारणीतील आमची ही दुसरी पिढी; २५ वर्षांहून अधिक अनुभव, आणि दगड, RCC व संगमरवरात ४५० हून अधिक पूर्ण मंदिरे. मंदिर एकदाच बांधले जाते, म्हणून आम्ही ते शंभर वर्षांसाठी बांधतो.

Temple projectsमंदिर प्रकल्प From ₹5 lakh₹५ लाखांपासून

Construction-linked payments · Cash, cheque or onlineकामाच्या टप्प्यांनुसार पेमेंट · रोख, चेक किंवा ऑनलाइन

What does a temple cost to build?मंदिर उभारायला खर्च किती येतो?

Every temple is different. These decide the cost:प्रत्येक मंदिर वेगळे, म्हणून खर्चही. तो ठरतो या तीन गोष्टींवर:

  • Size: the base area, the garbhagruh and the sabhamandapआकार: पायाचे क्षेत्रफळ, गाभारा आणि सभामंडप
  • Material: stone, RCC or marbleसाहित्य: दगड, RCC की संगमरवर
  • Carving and shikhar height: how detailed and how tallकोरीव काम आणि शिखराची उंची: नक्षी किती बारीक, शिखर किती उंच
Enquire nowचौकशी करा

Temple construction in Pune, Mumbai and across Indiaपुणे, मुंबई आणि देशभरात मंदिर बांधकाम

Our office is in Baner, Pune. We build across Pune, Mumbai and Maharashtra, and take on temple projects anywhere in India.आमचे कार्यालय बाणेर, पुणे येथे. पुणे, मुंबई, अवघा महाराष्ट्र आणि देशभरात कुठेही आम्ही मंदिर उभारतो.

Puneपुणे PCMCपिंपरी-चिंचवड Mumbaiमुंबई Thaneठाणे Navi Mumbaiनवी मुंबई Lonavalaलोणावळा Sataraसातारा Sangliसांगली All Indiaसंपूर्ण भारत

Site visits are free within 250 km of Pune.पुण्यापासून २५० किमीपर्यंत जागेची पाहणी मोफत.

Questions committees ask us before they startकाम सुरू करण्याआधी समित्यांच्या मनात येणारे प्रश्न

How much does a temple cost?मंदिर उभारायला खर्च किती येतो?

Our projects start from ₹5 lakh. The final cost depends on the size, the material (stone, RCC or marble), the amount of carving and the shikhar height. Send us your site location and land dimensions, choose a design with us at the site visit, and we'll send you a quotation.आमचे प्रकल्प ₹५ लाखांपासून सुरू होतात. पुढचा खर्च आकार, साहित्य (दगड, RCC की संगमरवर), कोरीव कामाची बारीकी आणि शिखराच्या उंचीवर ठरतो. जागेचे ठिकाण आणि जमिनीचे माप पाठवा. साईट व्हिजिटला तिथेच डिझाइन निवडू, आणि मग कोटेशन तुमच्या हाती देऊ.

How long does it take?मंदिर उभे राहायला किती वेळ लागतो?

Most RCC temples are completed in 3 to 4 months. Carved stone temples take longer. Your quotation states the timeline in writing.बहुतेक RCC मंदिरे ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होतात. कोरीव दगडी मंदिरांना थोडा जास्त वेळ लागतो. नेमका कालावधी कोटेशनमध्ये लेखी दिलेला असतो.

How do payments work?पेमेंट कसे आणि केव्हा करायचे?

Payments are linked to construction stages, starting with an advance when the work order is signed. We accept cash, cheque or online payment.वर्क ऑर्डरवर सही करताना ॲडव्हान्स, आणि पुढचे पेमेंट कामाच्या टप्प्यांनुसार. रोख, चेक की ऑनलाइन, जसे सोयीचे.

Do you follow Shilpa Shastra and Vastu?शिल्पशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे पालन होते का?

Yes. The proportions, the direction and the placement of the garbhagruh follow Shilpa Shastra and Vastu.हो, नक्कीच. मंदिराचे प्रमाण, दिशा आणि गाभाऱ्याची जागा, सारे शास्त्राप्रमाणे ठरते.

What do we need to provide?आमच्याकडून काय तयारी लागेल?

Water for construction, space to store material, and a power connection. We handle the rest.बांधकामासाठी पाणी, साहित्य ठेवायला जागा आणि विजेची जोडणी. बाकी सगळी जबाबदारी आमची.

Do you work outside Pune and Mumbai?पुणे-मुंबईबाहेरही काम करता का?

Yes, we build temples anywhere in India. Site visits are free within 250 km of Pune.हो, देशभरात कुठेही. पुण्यापासून २५० किमीपर्यंत जागेची पाहणी मोफत.

Do you build home mandirs?घरातील देव्हारे बनवता का?

No. We build standalone temples for trusts, societies, builders and families, starting from ₹5 lakh.नाही. आम्ही देवस्थान ट्रस्ट, सोसायट्या, बिल्डर आणि कुटुंबांसाठी स्वतंत्र मंदिरे उभारतो, ₹५ लाखांपासून पुढे.

Built with devotion. Crafted with precision. Blessed for eternity.आजचे मंदिर, उद्याच्या पिढ्यांचा वारसा.

Walk into your next committee meeting with a real number.पुढच्या समिती बैठकीत ठोस आकडा घेऊन जा.

Every temple starts with one message. Send us a few photos of your site, its size, and the deity you are building for. We'll reply the same day with the next step, then visit your site (free within 250 km of Pune) and give you an itemised estimate you can put in front of your committee. Asking costs you nothing, and you're under no obligation.प्रत्येक मंदिराचा श्रीगणेशा एका मेसेजने होतो. जागेचे काही फोटो, माप आणि कोणत्या देवतेचे मंदिर, एवढे कळवा. त्याच दिवशी उत्तर, मग जागेची पाहणी (पुण्यापासून २५० किमीपर्यंत मोफत), आणि समितीपुढे ठेवता येईल असा सविस्तर अंदाज. विचारायला पैसे लागत नाहीत, आणि कोणतेही बंधन नाही.

Enquire nowचौकशी करा

Prefer to call? +91 88888 80868 · Office: Baner, Pune फोन करायचा आहे? +91 88888 80868 · कार्यालय: बाणेर, पुणे

Prefer a form? We'll call you back.फॉर्म भरायचा आहे? आम्ही तुम्हाला फोन करू.

Takes one minute. Only name and mobile are required. We reply the same day.फक्त एक मिनिट. नाव आणि मोबाइल एवढेच आवश्यक. त्याच दिवशी उत्तर.

1 · About you१ · तुमच्याविषयी

2 · About the temple२ · मंदिराविषयी

Your details are used only to reply to your enquiry.तुमची माहिती फक्त तुमच्या चौकशीला उत्तर देण्यासाठी वापरली जाईल.

WhatsApp / CallWhatsApp / फोन+91 88888 80868
Call 88888 80868फोन 88888 80868 Enquire nowचौकशी करा