Sacred architectureमंदिरशास्त्र

A temple is not merely a structure; it is a sacred experience.मंदिर म्हणजे केवळ वास्तू नाही, तर श्रद्धेचे पवित्र स्थान.

Every part of a traditional Hindu temple carries meaning, from the grid it is drawn on to the kalasha at its crown. Here is what that meaning is, and how we honour it when we build.पायाखालच्या मंडलापासून माथ्यावरील कळसापर्यंत, पारंपरिक हिंदू मंदिराच्या प्रत्येक अंगाला अर्थ आहे. तो अर्थ काय, आणि बांधताना आम्ही तो कसा जपतो, ते इथे.

देवालयः श्रद्धायाः प्रतीकः।A temple is a symbol of faith

One temple, three meaningsएक मंदिर, तीन अर्थ

The Shilpa texts read the temple at three scales at once: the whole universe, the mountain at its centre, and the human being.शिल्पग्रंथ मंदिराकडे एकाच वेळी तीन पातळ्यांवर पाहतात: संपूर्ण विश्व, त्याच्या केंद्रस्थानी उभा पर्वत, आणि माणूस.

Brahmanda · the universeब्रह्मांड

The temple is a three-dimensional mandala: an ordered picture of the whole cosmos, with the divine at its centre.मंदिर म्हणजे त्रिमितीतील मंडल: संपूर्ण विश्वाचे सुबक चित्र, आणि त्याच्या केंद्रस्थानी परमेश्वर.

Meru · the cosmic axisमेरू · विश्वाचा अक्ष

The shikhara rises as Mount Meru, the mountain at the centre of the world that joins earth to heaven.शिखर म्हणजे मेरू पर्वत: पृथ्वी आणि स्वर्ग जोडणारा, विश्वाच्या मध्यभागी उभा पर्वत.

Purusha · the human bodyपुरुष · मानवी देह

The temple is also a body. Walking from the gate to the sanctum is a journey inward, from the senses to the heart.मंदिर हा एक देहही आहे. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंतचा प्रवास म्हणजे इंद्रियांकडून हृदयाकडे जाणारा अंतर्मुख प्रवास.

From the heart to the crownहृदयापासून मुकुटापर्यंत

Four parts that carry the temple's deepest meaning, and the care each one asks of its builders.मंदिराचा गाभा असलेली चार अंगे, आणि त्यातील प्रत्येकासाठी बांधणाऱ्यांकडून अपेक्षित असलेली काळजी.

Garbhagrihaगर्भगृह Sanctum sanctorum · the womb chamberगाभारा · विश्वाचे गर्भस्थान

The innermost sanctum is traditionally kept dark and windowless. It is the cosmic womb, where the formless Brahman takes form as the deity; and within the devotee, it is the heart, the seat of the Atman. The darkness stands for the unmanifest. The deity, and the single flame of the lamp, stand for pure consciousness.मंदिराचे सर्वांत आतले स्थान परंपरेने अंधारे, खिडकीविना ठेवले जाते. हे विश्वाचे गर्भस्थान: इथे निराकार ब्रह्म देवतेच्या रूपात साकार होते. भक्ताच्या दृष्टीने हे हृदय, आत्म्याचे आसन. इथला अंधार म्हणजे अव्यक्त, आणि मूर्ती व समईची एकच ज्योत म्हणजे शुद्ध चैतन्य.

How we build itआम्ही ते कसे उभारतो

The size of the garbhagriha is the module from which the whole temple is proportioned, so we fix it first. Around it, our structural engineer designs for lasting stillness: a sound foundation, a true plinth and a frame built to resist cracking and settling.संपूर्ण मंदिराचे प्रमाण याच गाभाऱ्याच्या मापावरून ठरते, म्हणून तो आधी निश्चित होतो. त्याच्याभोवतीची रचना आमचे इंजिनिअर स्थैर्यासाठीच घडवतात: भक्कम पाया, अचूक चौथरा आणि तडे जाणे, खचणे टाळणारी मजबूत चौकट.

Shikhara · Vimanaशिखर · विमान The tower above the sanctumगाभाऱ्यावरील शिखर

Rising directly above the garbhagriha, the shikhara (called the vimana in the southern tradition) is Mount Meru, the axis of the world. In the body it is the spine, the sushumna nadi through which, in yogic thought, energy rises. Its upward sweep is the ascent of the soul towards liberation (moksha).गाभाऱ्याच्या अगदी वर उभे राहणारे शिखर (दक्षिण परंपरेत विमान) म्हणजे विश्वाचा अक्ष, मेरू पर्वत. देहात तो पाठीचा कणा, योगशास्त्रातील सुषुम्ना नाडी, जिच्यातून ऊर्जा ऊर्ध्वगामी होते. शिखराची वर झेपावणारी रेषा म्हणजे मोक्षाकडे निघालेल्या आत्म्याचा प्रवास.

How we build itआम्ही ते कसे उभारतो

We model the tower in 3D on the exact centreline of the sanctum, so its curve, its tiers and every miniature spire stay in proportion, and its weight travels safely down to the foundation.शिखराचा 3D आराखडा गाभाऱ्याच्या नेमक्या मध्यरेषेवर काढतो, म्हणजे त्याची वक्ररेषा, थर आणि प्रत्येक छोटे शृंग प्रमाणात राहते, आणि त्याचे वजन सुरक्षितपणे पायापर्यंत पोहोचते.

Amalakaआमलक The ribbed crowning stoneशिखरावरील रेषांकित दगडी चक्र

Near the summit of a Nagara shikhara sits the amalaka, a ribbed circular stone named after the amla fruit. It is read as the sun or as a lotus, and as the gateway between the earthly temple and the higher realms.नागर शिखराच्या माथ्याजवळ बसणारे रेषांकित, गोल दगडी चक्र म्हणजे आमलक; आवळ्याच्या आकारावरून आलेले नाव. ते सूर्याचे वा कमळाचे प्रतीक, आणि पार्थिव मंदिर व उच्च लोक यांच्यामधील द्वार मानले जाते.

How we build itआम्ही ते कसे उभारतो

It is carved precisely and set dead-centre on the tower, because it carries the kalasha above it.ते अचूक कोरून शिखराच्या अगदी मध्यावर बसवले जाते, कारण त्यावरच कळस विराजमान होतो.

Kalashaकलश · कळस The crowning potमंदिराचा मुकुट

The kalasha crowns the whole temple. As the Purna-Kalasha it means fullness and prosperity; it holds the nectar of immortality (amrita); and in the temple read as a body, it is the Sahasrara, the crown chakra, where the ascent is complete.संपूर्ण मंदिराचा मुकुट म्हणजे कळस. पूर्णकलश म्हणून तो पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक; त्यात अमृताचा वास; आणि देहरूपी मंदिरात तो सहस्रार, जिथे ऊर्ध्वगमन पूर्ण होते.

How we build itआम्ही ते कसे उभारतो

Its size, metal and finish are chosen with your committee, and it is raised at the kalasharohan ceremony on a muhurta set by your priest.कळसाचे माप, धातू आणि झळाळी समितीसोबत ठरते, आणि आपल्या पुरोहितांनी ठरवलेल्या मुहूर्तावर कळसारोहण होते.

Diagram: the temple as the human body, from entrance (feet) to kalasha (crown) Kalashathe crown (Sahasrara) Amalakasun · lotus · gateway Shikharathe head · Meru · the spine Garbhagrihathe heart · womb chamber Mandapathe body Entrancethe feet कळसमस्तक (सहस्रार) आमलकसूर्य · कमळ · उच्च लोकांचे द्वार शिखरशिर · मेरू · पाठीचा कणा गर्भगृहहृदय · गर्भस्थान मंडपधड प्रवेशद्वारपाय
The dotted line is the temple's axis: Meru in the cosmos, the spine in the body.ठिपक्यांची रेषा म्हणजे मंदिराचा अक्ष: विश्वात मेरू, देहात पाठीचा कणा.

The temple as the human bodyदेहरूपी मंदिर

Traditional texts describe the temple as a body. Read it from the ground up:पारंपरिक ग्रंथ मंदिराला देह मानतात. पायापासून मस्तकापर्यंत असे:

  • FeetपायGopuram · entranceगोपुर · प्रवेशद्वारwhere every journey beginsइथूनच प्रत्येक यात्रेची सुरुवात
  • BodyधडMandapaमंडपwhere the community gathersजिथे भक्तसमुदाय एकत्र येतो
  • HeartहृदयGarbhagrihaगर्भगृहwhere the divine dwellsजिथे देवाचा वास
  • Headमस्तकShikhara, crowned by the kalashaशिखर आणि त्यावरील कळसthe Sahasrara, where the ascent is completeसहस्रार, जिथे ऊर्ध्वगमन पूर्ण होते

In the Nagara temples of Maharashtra, the entrance is usually a porch (mukhamandapa) rather than a gopuram. The meaning is the same.महाराष्ट्रातील नागर मंदिरांत गोपुराऐवजी बहुधा मुखमंडप असतो; अर्थ मात्र तोच.

The Vastu Purusha Mandala: the plan beneath every templeवास्तुपुरुष मंडल: प्रत्येक मंदिराचा अदृश्य पाया

Before a single line is drawn, the site is read as a sacred square grid, usually of 64 (8×8) or 81 (9×9) squares. The centre, the Brahmasthana, belongs to Brahma; the squares around it belong to specific deities and cosmic forces. The garbhagriha is placed at the heart of the grid, so the deity sits where the cosmos itself is centred.एकही रेषा काढण्याआधी जागा एका पवित्र चौकोनी जाळीतून पाहिली जाते, साधारणपणे ६४ (८×८) किंवा ८१ (९×९) पदांची. मध्यभागचे ब्रह्मस्थान ब्रह्मदेवाचे, आणि भोवतीची पदे विविध देवता व वैश्विक शक्तींची. गाभारा या जाळीच्या हृदयस्थानी येतो, म्हणजे जिथे विश्वाचे केंद्र, तिथेच देवाचे आसन.

How we build itआम्ही ते कसे उभारतो

We draw the 3D model on this grid. Your committee sees the mandala, the plan and the finished temple together, and your acharya can confirm every placement before construction begins.आमचा 3D आराखडा याच जाळीवर रेखला जातो. मंडल, नकाशा आणि तयार मंदिर समितीला एकत्र पाहता येते, आणि बांधकामाआधी आपले आचार्य प्रत्येक स्थान तपासू शकतात.

Texts and regions differ in the grid they prescribe and in its details. We follow the tradition your acharya and sampradaya hold.कोणती जाळी आणि कोणते तपशील, हे ग्रंथ आणि प्रदेशानुसार बदलते. आपले आचार्य आणि संप्रदाय जी परंपरा मानतात, तीच आम्ही पाळतो.

Diagram: an 8 by 8 Vastu Purusha Mandala of 64 squares, with the Brahmasthana at the centre Brahmasthana at the centre 64 padas (8 × 8), each held by a deity or a cosmic force मध्यभागी ब्रह्मस्थान ६४ पदे (८ × ८); प्रत्येक पद एका देवतेचे वा वैश्विक शक्तीचे

Temples that teach usज्या मंदिरांकडून आम्ही शिकतो

India's great temples are our reference books. These are not our projects; they are the traditions every temple we build draws from.भारतातील महान मंदिरे हेच आमचे संदर्भग्रंथ. ही आमची कामे नव्हेत; पण आम्ही उभारतो त्या प्रत्येक मंदिराची मुळे याच परंपरांत आहेत.

Photos: Unsplashछायाचित्रे: Unsplash

Where faith finds a home, a temple rises.जिथे श्रद्धेला घर मिळते, तिथे मंदिर उभे राहते.

Where devotion meets architecture, divinity takes shape.प्रत्येक दगडात भक्ती, प्रत्येक कोरीव कामात संस्कृती.

Build a temple that carries this meaning.हा अर्थ जपणारे मंदिर उभारूया.

Send us a few photos of your site and tell us the deity you are building for. We'll reply the same day, and show you how the mandala, the shastra and sound engineering come together in your temple.जागेचे काही फोटो आणि कोणत्या देवतेचे मंदिर, एवढे कळवा. त्याच दिवशी उत्तर देऊ, आणि मंडल, शास्त्र व भक्कम इंजिनिअरिंग तुमच्या मंदिरात कसे एकवटतील ते दाखवू.

Enquire nowचौकशी करा

Prefer to call? +91 88888 80868 · Office: Baner, Pune फोन करायचा आहे? +91 88888 80868 · कार्यालय: बाणेर, पुणे
Or fill a 30-second form and we will call you back.किंवा ३० सेकंदांचा फॉर्म भरा, आम्ही फोन करू.

WhatsApp / CallWhatsApp / फोन+91 88888 80868
Call 88888 80868फोन 88888 80868 Enquire nowचौकशी करा